जर सबस्क्रायबरने त्याचे कनेक्शन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविण्याची विनंती केली, तर वितरकाने तांत्रिक किंवा व्यावहारिक दृष्ट्या शक्य असल्यास असे कनेक्शन, विनंती मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत दुसऱ्या ठिकाणी लावून द्यावे. जर वितरकाला असे करण्याची परवानगी असेल तरच असे केले पाहिजे, परिस्थिती अनुरूप, अशा सबस्क्रायबर कडून -
(i) तितकीच रक्कम आकारण्यात यावी, जी वितरक इंस्टॉलेशन शुल्काच्या दुप्पट रकमेपेक्षा जास्त नसावी, जर या कार्यात कस्टमरच्या आधीच्या जागेवरून काही बाह्य उपकरण काढून नवीन जागी लावण्याचे कार्य समाविष्ट असेल. किंवा
(ii) तितकीच रक्कम घ्यावी, जी वितरक इंस्टॉलेशन शुल्कापेक्षा अधिक नको, तथापि, यात कस्टमरच्या जुन्या जागेवरून कुठलेही बाह्य उपकरण काढणे आणि नवीन जागी लावणे समाविष्ट केलेले नाही.